बावनकुळेंच्या ठाकरेंवरील टीकेला अंधारे, देशमुखांचा पलटवार; म्हणाले, कुवत आणि दुध…
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली हा इशारा देण्याची कुवत, ताकद उमेदवारीचं तिकीट मिळवण्यासाठी वापरावी असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे
मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा आमने सामने आला आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तर देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले होते. ज्यावरून आता चांगलेच राजकारण तापलेलं आहे. ठाकरे यांच्या फडणवीस यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी राज्याचा अध्यक्ष म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आज तुम्हाला शेवटची संधी दिली. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा असा दम दिला. त्यावरून ठाकरे गटाकडून बावनकुळेंचा समाचार घेतला जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली हा इशारा देण्याची कुवत, ताकद उमेदवारीचं तिकीट मिळवण्यासाठी वापरावी असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. तर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी, ओरिजनल दूध न पिलेला माणूस म्हणजे बावनकुळे, मतिमंद माणूस अशी टीका केली आहे. अंधारे आणि देशमुखांच्या या पलटवारामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.