शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर; बड्या नेत्याकडून पंतप्रधानांचं समर्थन
देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मुद्यांसह भाष्य करताना शरद पवारांवरही निशाणा साधला. यावेळी 'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब', असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्य अगदी बरोबर असल्याचे म्हणत शिंदे गटातील नेत्यानं समर्थन केलंय.
शरद पवार हे या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मुद्यांसह भाष्य करताना शरद पवारांवरही निशाणा साधला. यावेळी ‘शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब’, असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्य अगदी बरोबर असल्याचे म्हणत शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मोदींनी केलेल्या वक्तव्याने समर्थन केल्याचे पाहायला मिळाले. ‘शरद पवार हे स्वतःचं कुटुंब आणि पक्ष सुद्धा एकत्र ठेवू शकले नाहीत असं नरेंद्र मोदी म्हणाले. या मागची कारणे काय आहेत हे शरद पवार सांगू शकतील. अजित पवारांची वक्तव्य आजही आम्ही ऐकतो. ते नेहमी शरद पवार सांगतील ते ऐकत आले, पण ज्या वेळेस महायुतीमध्ये शरद पवार यांनी जाण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत आल्यावर तो बदलला हे अजित पवारांच्या तत्त्वात न बसल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली असे अजित पवार म्हणाले. यामुळेच शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब हे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्य अगदी बरोबर आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.