शिंदे अन् दादांचं कुठं अडलं? जागावाटपासंदर्भात अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं जागावाटपावरून काहिसं अडलंय. महायुतीचं जागावाटप आणखी काही दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे. कारण आता महायुतीला मनसेचं इंजिन लागण्याची शक्यता आहे.
मुंबई, २० मार्च २०२४ : महायुतीच्या जागावाटपावरून बैठकांचं सत्र सुरूच आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. तर सहा खासदारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं जागावाटपावरून काहिसं अडलंय. महायुतीचं जागावाटप आणखी काही दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे. कारण आता महायुतीला मनसेचं इंजिन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेसोबत वाटाघाटी झाल्यावर महायुतीचा फॉर्म्युला समोर येईल. भाजपने आतापर्यंत २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार गट ४ पेक्षा अधिक जागांवर आग्रही आहे. त्यासाठी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर जागांच्या अदलाबदलीच्या संदर्भात फडणवीस दादांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपनं ४ जागा दाखवण्याची तयारी दाखवली आहे. ज्यात बारामती, रायगड, परभणी आणि शिरूरचा समावेश असल्याचे म्हटलं जात आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…