विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तासांपासून गायब अन्...

विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तासांपासून गायब अन्…

| Updated on: Oct 30, 2024 | 10:40 AM

श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची माफी मागतो, माझी चूक झाली… असे म्हणत नॉट रिचेबल होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी tv9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा गेल्या २४ तासांपासून बेपत्ता होते. मोबाईल सुद्धा बंद असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आलेत. अखेर ३६ तासांनी वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ते घरी आलेत. आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा ते आपल्या नातेवाईकांकडे गेले असे त्यांच्या पत्नीने सांगितले. मात्र श्रीनिवास वनगा हे नॉटरिचेबल झाल्याने त्यांचे कुटुंब चिंतेत होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये साथ देणारे पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी शिंदेंच्या शिवसेनेने राजेंद्र गावित यांना विधानसभेची उमेगवारी दिली. त्यावेळी देवासारख्या उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंना साथ दिल्याचा पश्चताप श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केला होता. श्रीनिवास वनगा यांचं विधानसभेचं तिकीट कापल्यानंतर दोन्ही शिवसेनेत वार-प्रतिवार सुरू झाले आहेत.

Published on: Oct 30, 2024 10:40 AM