आढळराव अजितदादा गटात? शिरुर लोकसभेत खेडच्या दिलीप मोहिते पाटलांमुळे खेळखंडोबा होणार?

आढळराव अजितदादा गटात? शिरुर लोकसभेत खेडच्या दिलीप मोहिते पाटलांमुळे खेळखंडोबा होणार?

| Updated on: Feb 29, 2024 | 11:44 AM

शिंदेंच्या शिवाजीराव आढळराव हे अजित पवार यांच्यागटात प्रवेश करतील, अशी चर्चा होतेय. मात्र आढळराव पक्षात आले तर मी घरी बसणार असे वक्तव्य खेडचे आमदार दिलीप मोहेते पाटील यांनी म्हटले आहे. आमच्या महायुती धर्मात कुणीही येवो, त्यांच्यासाठी आमचे दुप्पटे तयार, अशी भाजपची भूमिका

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : शिरूर लोकसभेत खेडच्या दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळे खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे. कारण शिरूरची जागा अजित पवार यांच्याकडे आली तर शिंदेंच्या शिवाजीराव आढळराव हे अजित पवार यांच्यागटात प्रवेश करतील, अशी चर्चा होतेय. मात्र आढळराव पक्षात आले तर मी घरी बसणार असे वक्तव्य खेडचे आमदार दिलीप मोहेते पाटील यांनी म्हटले आहे. आमच्या महायुती धर्मात कुणीही येवो, त्यांच्यासाठी आमचे दुप्पटे तयार आहेत. अशी भाजपची भूमिका आहे. मात्र याच महायुती धर्मात इनकमिंगवरून खटके उडण्यास सुरूवात झाली आहे. दिलीप मोहिते हे पुण्यातील खेडचे आमदार आहेत. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असून सत्तेत आहेत. यापूर्वीचं खेडचं राजकारणही मोहिते पाटील आणि आढळराव पाटील असंच राहिलंय. २०१४ ला मोहित पाटलांच्या आमदारकीची हॅट्रिक हुकली. तर आढळरावांच्या मदतीने शिवसेनेचे सुरेश गोरे खेडचे आमदार झाले. तेव्हापासून आजपर्यंत मोहिते आणि आढळराव यांच्यात संघर्ष हा सुरूच आहे.

Published on: Feb 29, 2024 11:44 AM