‘संजय राऊत मूर्ख माणूस त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय’, कुणी केली जहरी टीका?
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, बघा काय केली टीका?
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनी जहरी टीका केल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले, संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. संजय राऊत यांनी मराठा समाजाच्या मूक मोर्च्याला मुका मोर्चा म्हटलं होतं. त्यामुळे संजय राऊत यांचा मराठा समजाबाबत असलेला आकस वारंवार दिसून येतो. आम्ही सर्वांनी मिळून मराठा समाजाचा मुख्यमंत्री केलाय ही पोटदुखी त्यांना जास्त झाली आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर मुख्यमंत्री बदलायचं यासाठी अमित शहा यांनी फोन केला होता का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांना होईल तेवढं बदनाम करण्याचा हा राऊतांचा प्रयत्न आहे इतकेच नाही तर मराठा समाजाचा मुख्यमंत्री झाल्याचे दु:ख त्यांना आहे. त्याचबरोबर शिवसेना फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत यांनी केलंलं असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.