शिरोळमधील पूरग्रस्त आक्रमक, तातडीनं मदत मिळवण्यासाठी मोर्चा

शिरोळमधील पूरग्रस्त आक्रमक, तातडीनं मदत मिळवण्यासाठी मोर्चा

| Updated on: Aug 17, 2021 | 3:09 PM

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांनी मोर्चा काढला. शिरोळ तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला आहे. पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चात अबालवृद्ध सहभागी झालेले आहेत.

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांनी मोर्चा काढला. शिरोळ तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला आहे. पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चात अबालवृद्ध सहभागी झालेले आहेत. कोल्हापूरच्या महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो. शिरोळमधील 43 गावं बाधित होतात. पूरग्रस्त गावांना अद्यापही मदत मिळालेली नाही. ऊस, धनगरी ढोल घेऊन आंदोलक त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तातडीनं मदत मिळावी यासाठी शिरोळ पूरग्रस्त आंदोलन करत आहेत.