Shirur Loksabha Election Exit Poll 2024 : शिरूरमध्ये कुणाची हवा? अमोल कोल्हे की आढळराव पाटील?
Shirur Loksabha Election Exit Poll 2024 शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी रणनिती केल्याचे पाहायला मिळाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाचील यांना आपल्याकडे घेतले
अमरावती लोकसभा मतदारसंध, बारामती लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देखील आधीपासून चर्चेत होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान, शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी रणनिती केल्याचे पाहायला मिळाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाचील यांना आपल्याकडे घेतले. इतकंच नाहीतर डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव यांना तिकीट देत अमोल कोल्हे यांच्यासमोर मोठं चॅलेंजच दिलं. मात्र TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार शिरुर मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार अढळराव पाटील पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचा विषय राज्यात सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे.