‘तुमची बोलायचीच कडी आणि बोलायचाच भात हा प्रकार बंद करा’, शितल म्हात्रे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर भडकल्या
आता देखील पत्रकार परिषद घेत म्हात्रे आणि कायंदे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मणिपूरबाबत शिंदे गटाकडून बोलले जात नसल्याने ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती.
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023 | शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात सध्या जोरदार वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. तर शिंदे गटात आधी शितल म्हात्रे आणि त्यानंतर मनीषा कायंदे यांनी प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. आता देखील पत्रकार परिषद घेत म्हात्रे आणि कायंदे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मणिपूरबाबत शिंदे गटाकडून बोलले जात नसल्याने ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती. त्यावरून आम्ही आंदोलन केलं नाही. मात्र आमच्या नेत्या निलम ताईंनी खुलं पत्र अमित शहा ना लिहलंय. ठाकरे गटाकडून महिलांबद्दल अनेकदा अपमान केला गेलाय. मात्र दुसऱ्या पक्षात गेलेल्या महिलांना कचरा म्हणायचे हे योग्य नाही असा टोला त्यांनी लागवला आहे. तर सोनिया गांधी यांना करप्शन क्वीन म्हटले होते मग आज तुम्ही त्यांच्यासोबत कसे? असाही सवाल यावेळी उपस्थित केलाय. त्याचबरोबर माझ्या बाबत एक व्हिडिओ मॉर्फ करु माझी बदनामी करणारेच आज काळ्या फिती लावून आंदोलन करत होते असा टोला शितल म्हात्रे यांनी लगावला आहे. तर ज्यावेळी आपली बदनामी केली जात असताना ठाकरेंनी काय भुमिका घेतली हे सर्वांना माहिती असल्याचंही ते म्हणाले. तर तुमची बोलायचीच कडी आणि बोलायचाच भात हा प्रकार बंद करा असेही त्या म्हणाल्यात.