मनसेकडून शिवाजी पार्कवर शिवजयंतीचं आयोजन, बघा जंगी तयारी

मनसेकडून शिवाजी पार्कवर शिवजयंतीचं आयोजन, बघा जंगी तयारी

| Updated on: Mar 10, 2023 | 11:37 AM

VIDEO | शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अशा अश्वरुढ पुतळ्यावर मनसेच्या नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी

मुंबई : आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अशा अश्वरुढ पुतळ्यावर मनसेच्या नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शिवजयंतीची तयारी सध्या जोरात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झेंडूच्या फुलांची आरस करण्यात आलेली आहे, पोवाडे लावण्यात आलेले आहेत, चौक सजवण्यात आलेला आहे , रंगरंगोटी आणि स्वच्छता करण्यात आलेली आहे. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये मनसेने शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरवलं असल्याने मनसेचे झेंडे आणि बॅनर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. तर मनसे प्रमुख राज ठाकरे या कार्यक्रमाला येणार असल्याची शक्यता व्यक्त होतेय, ते कार्यकर्त्यांना काही मुलमंत्र देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Published on: Mar 10, 2023 11:37 AM