shiv sangram Vinayak mete passed away: डॉक्टरांची प्रतिक्रिया! “डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू”
डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय. इथे आणल्यावर त्यांचं पल्स, बीपी आणि डोळ्यांचे प्यूपिल्स काहीच काम करत नव्हतं चेकअप केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं गेलं.
विनायक मेटे यांच्या गाडीत एक ड्रायव्हर आणि एक पोलीस होता. ड्रायव्हरची अवस्था व्यवस्थित आहे. पोलीस गंभीर जखमी आहे आमचं इमर्जन्सी डिपार्टमेंट त्यांना ट्रीटमेंट देत आहे. विनायक मेटे यांचा अपघातस्थळीच मृत्यू झालेला आहे. सकाळी 6 वाजता त्यांना हॉस्पिटल मध्ये आणलं गेलं, त्यांचा बीपी, पल्स सगळं चेक केलं, डोळे चेक त्यावेळीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. सोबत असणाऱ्या पोलिसाला बराच मार लागलाय. विनायक मेटेंच्या डोक्याला जबरदस्त मर लागलाय. डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय. इथे आणल्यावर त्यांचं पल्स, बीपी आणि डोळ्यांचे प्यूपिल्स काहीच काम करत नव्हतं चेकअप केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं गेलं. अशी प्रतिक्रिया एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलीये. विनायक मेटे (Vinayak Mete) म्हणजे मराठा आंदोलनांचा बुलंद आवाज. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे (Shivsangram) नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्यानं त्यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातीये.