वंचितसोबतच्या युतीमुळे ठाकरे गटाला बसणार फटका? काय म्हणाले संदीपान भुमरे
शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवणार?
सोलापूर : शिवसेने वंचितसोबत केलेल्या युतीमुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी केले आहे. यासह पक्षाकडून आदेश आला तर औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचा निर्धारही संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भुमरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर देखील भाष्य केले. ते म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नसला तरी, कामं सुरूच होती. पण आता मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे, आणि अधिवेशनापूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सी व्होटर हा सर्वे कोणी केला का केला हे माहित नाही, पण लवकरच तुम्हाला कळेल की कोणाची पिछेहाट होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांची कामं करून कष्टकऱ्यांचे निर्णय घेत आहे. त्यामुळे जनता नक्की मतं देणार असेही भुमरे म्हणाले.