Uddhav Thackeray | शिवसेना आणि राष्ट्रवादीत विसंवाद?
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विसंवाद असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सोमय्यांवरील कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विसंवाद असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सोमय्यांवरील कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते. सोमय्या यांच्यावरील कारवाईची माहितीच नव्हती, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी माहिती होती की नाही याबाबत कल्पना नाही, असं म्हणत सावध पवित्रा घेतला होता.
Latest Videos