MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत न्यायालय काय निर्णय घेणार? नार्वेकर सुधारित वेळापत्रक सादर करणार?
VIDEO | शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज एकत्रित सुनावणी होणार, गेल्या काही दिवसांपूर्वी १७ ऑक्टोबर रोजी आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी झाली. त्यानंतर आज यावर सुनावणी होणार आहे. आज न्यायालयात राहुल नार्वेकर सुधारित वेळापत्रक सादर करणार?
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | आमदार अपात्रेबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील आमदारांबाबत आज एकत्रित सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी १७ ऑक्टोबर रोजी आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी झाली. त्यानंतर आज यावर सुनावणी होणार आहे. आजच्या न्यायालयीन कामकाजाच्या वेळापत्रकात शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा समावेश करण्यात आला असून सकाळी ११ वाजेनंतर ही सुनावणी सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले होते. तर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणीचं वेळापत्रक सादर करण्यासाठी शेवटची संधी असल्याचे सांगितले होते. तर राहुल नार्वेकर हे वेळापत्रक आज सादर करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.