Kankavli | कणकवलीत शिवसेना-भाजप आमने-सामने, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
आज नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होत आहे, मात्र त्याआधी कणकवलीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले आहेत. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आज नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होत आहे, मात्र त्याआधी कणकवलीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले आहेत. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. शिवाय त्यांच्या जामिनावरची आज सुरू असलेली सुनावणीही आता उद्या होणार आहे. याच अनुषंगाने नितेश कुठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. त्यांच्या घरावर ही नोटीस चिपकावण्यात आली. मात्र, दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली.