Badlapur | बदलापुरात लसीकरण केंद्रावर शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
एकीकडे कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण राबवण्यात येत आहे. मात्र बदलापूर येथे लसीकरण केंद्रावरच भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण सुरु असताना बदलापूर येथील लसीकरण केंद्रात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला असून एका कार्यकर्त्याच्या डोक्यात बेंच टाकण्यात आला आहे. बदलापुर पालिकेच्या दुबे रुग्णालयात ही घटना घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Latest Videos