Special Report | धोका दिल्यानं शिवसेना फोडली
शिवसेनेनं धोका दिल्यानंच भाजपनं शिवसेनेला तोडलं असं सुशीलकुमार मोदी जाहीरपणे म्हणाले. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. सुशीलकुमार मोदींच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालाय. पण यावर महाराष्ट्र भाजपचे नेते मात्र सारवासारव करतायत.
मुंबई : शिवसेनेतली बंडाळी हा शिवसेनेतलाच अंतर्गत प्रश्न असल्याचं महाराष्ट्र भाजपचे नेते आजही सांगतायत. पण भाजपच्याच केंद्रीय नेत्यांच्या काही वक्तव्यांमुळं महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची चांगलीच अडचण झालीय. बिहारमध्ये नितीश कुमारांनी एनडीएची साथ सोडली. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करुन नवं सरकार तयार केलं. आणि त्यानंतर भाजप नेत्यांनी नितीश कुमारांवर टीका केली. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी यांनीही नितीश कुमारांवर निशाणा साधला आणि शिवसेनेलाही या वादात ओढलं.
शिवसेनेनं धोका दिल्यानंच भाजपनं शिवसेनेला तोडलं असं सुशीलकुमार मोदी जाहीरपणे म्हणाले. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. सुशीलकुमार मोदींच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालाय. पण यावर महाराष्ट्र भाजपचे नेते मात्र सारवासारव करतायत.
शिवसेनेतल्या फुटीशी आमचा संबंध नाही असं भाजप नेते सत्तास्थापनेच्या काळात ठामपणे सांगत होते. त्याच काळात एक राष्ट्रीय शक्ती आपल्या मागे उभं असल्याचं एकनाथ शिंदे बोलत होते.
शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतरही शिवसेनेतल्या बंडाळीशी आपला काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते सांगत होते. पण एकनाथ शिंदे मात्र याच्या बरोबर उलट बोलत होते. याही आधी जे पी नड्डा यांनी शिवसेना संपत चाललेला पक्ष असल्याचं म्हटलं होतं. ज्यावर उद्धव ठाकरेंनीही टीका केली होती. प्रादेशिक पक्ष फोडण्याचं भाजपचं षडयंत्र असल्याची टीका पवार, ठाकरे आणि नितीश कुमार बोलून दाखवतात. आणि विरोधकांच्या या आरोपांना बळ देण्याचं कामंच भाजपचे केंद्रीय नेते त्यांच्या वक्तव्यांमधून करतायत.