तब्बल 'इतक्या' हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त कुणी दिली अनोखी भेट?

तब्बल ‘इतक्या’ हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त कुणी दिली अनोखी भेट?

| Updated on: Jul 26, 2024 | 5:30 PM

आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त 'भावी मुख्यमंत्री' अशी पोस्टरबाजी देखील बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे देखील भावी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका शिवसैनिकाकडून अनोखी भेट देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे दावे-प्रतिदावे केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी मुख्यमंत्री’ अशी पोस्टरबाजी देखील बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे देखील भावी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका शिवसैनिकाकडून अनोखी भेट देण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम कलाकार शैलेश आचरेकर यांच्या कलाकृतीतून हे पोर्टेट साकारण्यात आले आहे. २७ हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईने यावर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते .

Published on: Jul 26, 2024 05:29 PM