Shivsena Crisis : 35 आमदार गुवाहाटीत दाखल, बंडखोर आमदारानं कॅमेरा बघताच चेहरा झाकला

| Updated on: Jun 22, 2022 | 6:39 AM

शिवसेनेचे बंडखोर 35 आमदार गुवाहाटी याठिकाणी दाखल झाले आहेत.

गुवाहाटी : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार (MLA) गुवाहाटी याठिकाणी दाखल झाले आहेत. यावेळी कॅमेरा दिसताच आमदार चेहरा झाकताना दिसले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे आता शिवसेनेत दोन गट पडल्याच दिसतंय. तर यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातंय. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा (Hindutva) विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही बंडखोर आमदाराने बंडखोरी केली नाही, असं वक्तव्य करत गर्व से कहो हम हिंदू है म्हणत बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सूरत विमानतळावरून गुवाहाटीमध्ये पोहचले आहेत.

Published on: Jun 22, 2022 06:39 AM
Narayan Rane on Uddhav Thackeray | स्वाभिमान असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-tv9
Shambhuraj Desai | शंभूराज देसाई यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार