‘त्यांना गाडून भगवा फडकवणार’, शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात बोलतान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर नाव न घेता जोरदार टीका केली. बघा काय केला उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल?
‘प्रत्येकाकडे वेगवेगळी शस्त्र असतात. कुणाकडे तलवार आहे. कुणाकडे मशीनगन आहे. पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. अनेक वर्षाच्या परंपरेने ठाकरे कुटुंबीयाने जी शस्त्रपूजा केली. त्यात इतर शस्त्र आहेत, पण शिवसेना प्रमुखांचा कुंचला, ज्याने फटकारे मारले आणि मनगटात ताकद दिली. त्या कुंचल्याची पूजा केली. आता तुमची पूजा करत आहे. तुम्ही शस्त्र आहात. ही लढाई साधी नाही. एकाबाजूला अब्दाली, केंद्राची माणसं, सत्ता, तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या गावंच्या गावं उद्ध्वस्त करायची. आता त्यांनी मनसुबा आखलाय उद्धव ठाकरेंना संपवायचं. पण त्यांना माहीत आहे, उद्धव ठाकरेंकडे ही समोरची वाघनखं आहेत. तुमचं पाठबळ नसतं तर मी उभा राहूच शकलो नसतो. तुम्ही आई जगदंबेसारखे उभे राहिला. मला कुणाची पर्वा नाही. त्यांच्या कितीही पिढ्या येऊ द्या. मी त्यांना गाडून उभा राहील’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले, ‘त्या मिंध्यांना सांगा तुझा विचार बाळासाहेंबांचा विचार नाही. त्यांनी जाहिरात केली. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, पुढच्या दोन ओळी राहिल्या अदानी आमची जान, आम्ही शेठजीचे श्वान. मी श्वानांचा अपमान करत नाही. मी श्वान प्रेमी आहे. पण मी लांडगा प्रेमी नाही. लांडग्यावर प्रेम करणारे औदार्य नाही. हे लांडगे आहेत. वाघाचं कातडं घातलं आहे. काय काय उघडं पडतंय माहीत नाही.’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर नाव न घेता जिव्हारी लागणारी टीका केली.