शिवसेना मुंबईला मागील 30 वर्षांपासून लुटतेय- राम कदम

शिवसेना मुंबईला मागील 30 वर्षांपासून लुटतेय- राम कदम

| Updated on: May 01, 2022 | 1:53 PM

"महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागेल या भीतीपोटी शिवसेनेचे नेते कपोलकल्पित आजच्या सामनामध्ये आरोप करत आहेत," अशी टीका राम कदम यांनी केली.

“महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागेल या भीतीपोटी शिवसेनेचे नेते कपोलकल्पित आजच्या सामनामध्ये आरोप करत आहेत. तुम्ही लोकांना मूर्ख समजता का? 30 वर्षांपासून तुम्ही मुंबईला लुटताय. दरोडेखोर असल्याप्रमाणे तुम्ही मुंबईकरांचे लचके तोडतायत. महापालिकेला लुटलंय तुम्ही. हे सर्व आम्ही पोलखोल सभेच्या माध्यमातून आम्ही पुढे आणलं तर भीतीपोटी आता काहीही आरोप लावाल,” असं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या लेखावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.