Shivsena vs Shinde | शिवसेना सुप्रीम कोर्टात याचिका मेन्शन करणार, आजच सुनावणी घेण्याची मागणी करणार
शिवसेनेकडून सरकारविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्याय. ज्यामध्ये बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर पेच निर्माण झाला आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण, विधानसभा अध्यक्षांची निवड, सरकारचे बहुमत अशा अनेक विषयांवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मागील सुनावणीत घटनापीठाकडे (constitutional bench hearing) सोपवालं आहे. आज घटनापीठासमोर (constitutional bench hearing on Maharashtra politics live) शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिंकांवर सुनावणीची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शिवसेनेकडून नव्या सरकारविरोधात (shiv sena vs eknath shinde live) अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.