Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

| Updated on: Nov 13, 2024 | 4:47 PM

अब्दुल सत्तार हे जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर हे किरकोळ लोक माझे काय करणार, असे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते, विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार हे जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तीन वेळेस सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर यंदा पुन्हा त्यांनी आपली ताकद प्रचार सभांमधून दाखवली आहे. अशातच माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. हे किरकोळ लोक माझ्याशी काय सामना करणार आहेत. मी गेल्या 25 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची काम केली आहेत. जो विकास कामे करतोय, त्याला मतदान करा”, असे आवाहन मतदार जनतेला अब्दुल सत्तार यांनी केले. अंजिठा येथे झालेल्या सभेत अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केले. जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार हे सातत्याने प्रचार करताना दिसत आहेत. आता नुकतंच अब्दुल सत्तार यांनी अजिंठा या ठिकाणी जाहीर सभा घेतली. या सभेत अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Published on: Nov 13, 2024 04:47 PM