अरे तुझ्या घरच्या लाट ना पोळ्या पहिल्यांदा… अडसूळांचा नवनीत राणांवर निशाणा, काय केली टीका?
अशी नवनीत राणा... हे लोकांना आवडलेलं नाही नुसतं नाटक आहे, असं म्हणत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. तर कोणत्यातरी बाईच्या घरी जायचं पोळ्या लाटायच्या, अरे तुझ्या घरच्या लाट ना पोळ्या पहिल्यांदा.. स्वतःच्या घरची पोळी एकदा तरी लाटली का? आनंदराव अडसूळ यांचा सवाल
नवनीत राणा यांनी गेल्या 5 वर्षात काहीच काम केलं नाही. नवनीत राणा यांनी एकतरी काम दाखवावं, असं वक्तव्य करत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. नवनीत राणा यांची फक्त नाटकबाजी सुरू असते. आदिवासी भागात जायचं. होळीला तिथे फेर धरायचं आणि नाचायचं असली कामं करणारी, दहीहंडी साजरा करणार, मोठ्या सिनेस्टारला आणणारी अशी नवनीत राणा… हे लोकांना आवडलेलं नाही नुसतं नाटक आहे, असं म्हणत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. तर कोणत्यातरी बाईच्या घरी जायचं पोळ्या लाटायच्या, अरे तुझ्या घरच्या लाट ना पोळ्या पहिल्यांदा.. स्वतःच्या घरची पोळी एकदा तरी लाटली का? असा सवाल करत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला.
Published on: May 24, 2024 01:02 PM
Latest Videos