शिवसेना नेत्या अन् अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? जवळच्या व्यक्तीचा दावा
VIDEO | 'दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध, इतकच नव्हे तर त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले', कुणी केला खळबळजनक दावा
अहमदनगर : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकच नाही तर त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही, असा मोठा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय. आज पत्रकार परिषद घेऊन दीपाली सय्यद यांच्या पाकिस्तान कनेक्शनचे थेट पुरावेच आम्ही दिले आहेत.