Uday Samant : मंत्रिमंडळ विस्तारावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य, कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

Uday Samant : मंत्रिमंडळ विस्तारावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य, कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

| Updated on: Oct 15, 2023 | 4:21 PM

VIDEO | नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता असताना दरम्यान, यावर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. मंत्रिमंडळ विस्तार करणं याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा आहे.

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती की, नवरात्रोस्तवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे. या नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता वर्तविली गेली होती. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य केले आहे. उदय सामंत म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार करणं हे ठरवण्याचा अधिकार आणि निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे. ते यावर चर्चा करून निर्णय घेतली. पण राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, असे म्हणत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

Published on: Oct 15, 2023 04:21 PM