गुलाबराव पाटील यांना कुणीही आव्हान देऊ शकत नाही, 'या' मंत्र्यानं स्पष्टच सांगितलं...

गुलाबराव पाटील यांना कुणीही आव्हान देऊ शकत नाही, ‘या’ मंत्र्यानं स्पष्टच सांगितलं…

| Updated on: Apr 23, 2023 | 2:12 PM

VIDEO | पाचोऱ्यातील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेपूर्वी गुलाबराव पाटील आणि ठाकरे गट आमने-सामने, शिवसेनेच्या मंत्र्यानं विरोधकांना नेमकं काय सुनावले?

रत्नागिरी : आज संध्याकाळी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वीच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून गुलाबराव पाटील यांना आव्हान देण्यात आले आहे. यावर उद्योगमंत्री आणि शिवेसनेचे नेते उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या राजकीय जीवनात कुणीही आव्हान देऊ शकत नाही. पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. तेथील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कुटुंबात फूट पाडून पाचोर्‍यातील त्यांच्या नातेवाईकांना ही सभा घ्यायला लावली आहे. पक्ष वाढवण्यासाठी आपण कुठल्या थराला जातोय हेच या सभेतून सिद्ध होईल. त्याचा गुलाबराव पाटील यांच्यावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर नऊ हजार खुर्च्या लावायच्या आणि एक लाख सांगायच्या ही विक्रमी सभा असणार, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

राज्यातील मंडप डेकोरेटर्स माझ्या संपर्कात असून यांच्याकडून मला सभेची खुर्च्यांची माहिती मिळते. परंतु कुणाच्या पक्षावर मला बोलायचे नसल्याचे त्यांनी म्हटले. यापुढे ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सत्तेत येतील, हे विरोधकांना माहिती असल्याचे म्हटले आहे.

Published on: Apr 23, 2023 02:10 PM