मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण… भावना गवळी भावूक; उमेदवारी मिळताच गहिवरल्या
शिवसेना नेत्या भावना गवळी यांनी आज विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यानंतर भावना गवळी यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या भावना देखील जाणून घेतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला ही उमेदवारी दिला आहे. त्यांनी खांद्यावर टाकलेली ही जबाबदारी ओळखून चांगलं काम करणार असल्याचे वचन दिले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेना नेत्या भावना गवळी यांनी आज विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यानंतर भावना गवळी यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. ‘ही उमेदवारी माझ्या मतदारसंघासाठी आनंदाची बाब आहे. पण एकनाथ शिंदे हे जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहे ते त्यांच्यासाठी काम करतात तसंच ते आपल्या कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या भावना देखील जाणून घेतात त्यामुळे त्यांनी मला ही उमेदवारी दिला आहे. त्यांनी खांद्यावर टाकलेली ही जबाबदारी ओळखून चांगलं काम करणार’, असं वचन भावना गवळी यांनी दिलं. ‘गेल्या वर्षी मी म्हटले होते मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती स्वीकारणार आणि पुढे जाणार आहे. जसं सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविली तसंच मी म्हणेन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण आहे’, असेही म्हटले.