संजय राऊत यांची लायकी नाही, 'या' मंत्र्यानं केली पाचोऱ्याच्या सभेतील भाषणावर सडकून टीका

संजय राऊत यांची लायकी नाही, ‘या’ मंत्र्यानं केली पाचोऱ्याच्या सभेतील भाषणावर सडकून टीका

| Updated on: Apr 24, 2023 | 7:40 AM

VIDEO | जळगाव जिल्ह्याच्या पाचोऱ्यातील सभेत संजय राऊत यांचं जोरदार भाषण, भाषणावर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं भाष्य

जळगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, ‘उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत भाषणात काय बोलतील हे मी आधीच सांगितलं होतं. संजय राऊत त्यांच्या भाषणा फक्त गुलाबो गँग म्हटले आणि खाली बसले. कोणतंही व्हिजन नसलेली ही उद्धव ठाकरे यांची सभा होती.’ ते पुढे असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मनात राग नाही पण ज्या माणसाने शिवसेना फोडली. त्यांच्याबद्दल राग आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कानात सांगितले असावे की शांत राहा. त्यामुळे त्यांचं भाषण कमी वेळात संपवंल. या सभेत संजय राऊत यांनी शिंदे गटाला राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले आहे. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ते कोण आम्हाला राजीनामा तयार ठेवा सांगणारे, आमच्या मतांवर मोठे झालेले हे लोकं, याचा संबंध काय? आम्ही त्यांना सांगतो त्यांनी राजनामी द्या. राजीनामा देण्याइतकी त्यांच्याकडे लायकी नसल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली.

Published on: Apr 24, 2023 07:40 AM