कुपोषित बालकांबरोबर मैत्री करून काय फायदा?, गुलाबराव पाटील यांनी कुणाला लगावला खोचक टोला
VIDEO | मित्र मिळाला तरी तो पैलवान असला पाहिजे, गुलाबराव पाटील यांनी कुणावर केला जोरदार हल्लाबोल, बघा व्हिडीओ
नाशिक : एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली, असे वक्तव्य मालेगावातील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी केलं. यावेळी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला. शुक्रवारी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी द्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर नव्या युतीचे संकेत त्यांनी दिले. त्यासंदर्भात बोलताना आता गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, मित्र मिळाला तरी तो पहिलवान असला पाहिजे. कुपोषित बालकांबरोबर मैत्री करून काय फायदा? आपच महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत आहे.
Published on: Feb 25, 2023 08:37 PM
Latest Videos