Gulabrao Patil : ‘मला गद्दार म्हणत होते, आता यांना काय गद्दार 2 +… ‘, गुलाबराव पाटलांचा कोणाला खोचक टोला?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर बोलताना शिवसेनेचे नेते माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव देवकर यांनी काय दिला थेट धमकी वजा इशारा?
स्वतःच्या बचावासाठी गुलाबराव देवकर कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही, मी त्यांचा भ्रष्टाचार काढणार, असं वक्तव्य करत गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना थेट धमकी वजा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर बोलताना शिवसेनेचे नेते माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘अशी या माणसाला काय घाई झाली. लगेच आठ दिवसांमध्ये या माणसाला पळावे लागत आहे. तर यांचा जिल्हा बँकेचा प्रॉब्लेम आहे. मजूर फेडरेशनचे दहा कोटींचा प्रॉब्लेम आहे, अटलांटा घोटाळा आहे. घरकुल घोटाळ्यात झालेली शिक्षा आहे हे सर्व बाहेर येईल आणि या सर्वांमध्ये त्यांचे हात बरबटलेले असल्यामुळे स्वतःचा बचाव करण्याकरता ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी देवकरांवर निशाणा साधला. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही असा थेट इशारा गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना दिला आहे. तर आतापर्यंत हे मला गद्दार म्हणत होते आता यांना मी काय गद्दार 2 + असे म्हणावं का? असा खोचक सवाल करत गुलाबराव पाटील यांनी त्यांना टोलाही लगावला आहे.