अयोध्येतील श्रीरामाकडे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांसाठी मागितलं मागणं, म्हणाले…
VIDEO | अयोध्येतील झालेल्या भगवंमय वातावरणावर आणि विरोधकांवर शिवसेना नेत्यानं काय केलं भाष्य?
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आज राम मंदिरात प्रभू रामाची महाआरती केली. दरम्यान, अयोध्येतील आजचं वातावरण हे भगवय झाले असताना अयोध्येतील प्रभू श्रीरामाकडे शिवेसनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांसाठी मागणं मागितलं आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात जे वातावरण आहे, त्यापेक्षा पाचपट अयोध्येत उत्साह आहे. जगभराला ज्या मंदिराची प्रतिक्षा आहे त्या रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि ही संधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांच्यामुळे मिळाली आहे. आमच्याकरता हा आनंदाचा दिवस आहे. दरम्यान, देशात आणि राज्यात अवकाळी पावसाचं संकट आहे, दुष्काळाचं संकट आहे ते दूर होऊदे आणि आमच्यावर जे सातत्याने टीका करताय त्यांना सुबुद्धी द्या’, असे गुलाबराव पाटील म्हणाले.