७२ तासांच्या पंतप्रधानांना आमच्या शुभेच्छा, मंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

७२ तासांच्या पंतप्रधानांना आमच्या शुभेच्छा, मंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 02, 2024 | 12:27 PM

कुणी तीन दिवसांसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊ शकतो. जो कुणी ७२ तासांचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार आहे. त्या ७२ तासांच्या पंतप्रधानांना महायुतीकडून शुभेच्छा आहे. तर २७८-३०० बोलायला काही फरक पडत नाही. आणि ७२ तास वैगरे हे स्वतःचं समाधान करून घेण्यासारखं आहे, उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

७२ तासांच्या पंतप्रधानांना आमच्या शुभेच्छा असल्याचे वक्तव्य करत शिवसेनेचे नेते, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीला खोचक टोला लगावला आहे. इतकंच नाहीतर यावेळी उदय सामंत यांनी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘कुणी तीन दिवसांसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊ शकतो. जो कुणी ७२ तासांचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार आहे. त्या ७२ तासांच्या पंतप्रधानांना महायुतीकडून शुभेच्छा आहे. तर २७८-३०० बोलायला काही फरक पडत नाही. आणि ७२ तास वैगरे हे स्वतःचं समाधान करून घेण्यासारखं आहे.’, असं म्हणत उदय सामंत यांनी इंडिया आघाडीला टोला लगावला तर पुढे ते असेही म्हणाले की, निर्विवादपणे नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहे. असं मतदान देशातील नागरिकांनी केलं आहे. हा सगळा टाईमपास सुरू आहे. ७२ तासांनंतर सर्वांना कळणार आहे की देशाचा पंतप्रधान नेमकं कोण होणार आहे, असं म्हणत त्यांनी मोदी पंतप्रधान होण्याचा विश्वास व्यक्त केला.

Published on: Jun 02, 2024 12:27 PM