एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर… गुलाबराव पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?

| Updated on: Jun 17, 2024 | 5:52 PM

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणणार असं वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षा खडसे यांनी केलं होतं. त्यावरच गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तर आमची हीच सदिच्छा आहे की दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणणार असं वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षा खडसे यांनी केलं होतं. त्यावरच गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘चांगली गोष्ट आहे मंत्री रक्षा खडसे जर दोघांना एकत्र आणत असतील तर त्यांनी प्रयत्न करावेत. आमची हीच सदिच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये एकीकरण दिसतं, त्याच पद्धतीने एकत्र यावं. त्यामुळे जिल्ह्यात सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र राहावं अशी जनतेची सुद्धा अपेक्षा आहे’, अशी गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Jun 17, 2024 05:52 PM