आम्ही पण पंतप्रधानांना शोधत होतो, संजय राऊतांचा भाजपला टोला
हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. मात्र काल अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न दिसल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे झोड उठवली. या टीकेला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई: हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. मात्र काल अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न दिसल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे झोड उठवली. या टीकेला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री सापडत नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. यावर पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असता, आम्ही देखील संसदेच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधानांना शोधतच होतो, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच दोन तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री हे विधानभवनात येतील असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Latest Videos