‘सत्ता गेल्यापासून जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरते’, कुणी केला हल्लाबोल?
VIDEO | जितेंद्र आव्हाड रात्री वेगळं बोलतात सकाळी वेगळं, शिनसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र
मुंबई : राष्ट्रवादी काँगेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड रात्री वेगळं बोलतात सकाळी वेगळं बोलतात. तर सत्ता गेल्यापासून जितेंद्र आव्हाड यांची रात्रीची जीभ घसरते, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. तर नुकताच जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आलाय. सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकऱणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पण आपले वक्तव्य मॉर्फ केल्याचे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप फेटाळत ओरिजनल व्हिडीओ समोर आणलाय. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आधी विनयभंगाचा गुन्हा, नंतर मारहाण केल्याचा गुन्हा आणि आता सिंधी समाजाच्या भावना दुखावल्याचा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.