‘संजय राऊत उकीरड्यावरच्या बेवारस कुत्र्यासारखे’, कुणी केला हल्लाबोल
VIDEO | सामना अग्रलेखातून केलेल्या त्या टीकेवर शिवसेनेकडून जशास तसे प्रत्युत्तर, बघा कुणी केला घणाघात?
कर्नाटक : ‘शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे. त्यामुळे भाजपच्या खाणाखुणांना भुलून जाणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्याचेच आमंत्रण आहे.’, अशी टीका आज दैनिक सामनातील अग्रलेखातून करण्यात आली आहे. या टीकेवर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत यांची स्वत:चीच अवस्था उकिरड्यासारखी झाली आहे. मध्यंतरी शरद पवार यांनी कोण संजय राऊत असा प्रश्न विचारला होता. तर आमच्यामध्ये चोमडेगिरी करू नये, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही हकलवून देताना दिसताय. स्वतः संजय राऊतांची अवस्था उकीरड्यावरच्या बेवारस कुत्र्यासारखी केली आहे तर शिवसेना, उद्धव ठाकरे यांची अवस्था उकीरड्यासारखी संजय राऊत यांनी केली आहे. यांची महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी आहे’, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.