‘ज्या घराण्याकडून मुंबईचा द्वेष, त्यांची चाकरी तुम्ही करताय’, शिवसेना नेत्याचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदार संजय राऊत यांनी मुलुंड घटनेला भाजप आणि एकनाथ शिंदे हे जबाबदार आहेत, अशी टीका केली होती. या टीकेवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बघा काय म्हणाले...
ठाणे, २९ सप्टेंबर २०२३ | मुलुंडमधील मराठी महिलेच्या व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. यानंतर आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे . संजय राऊत याना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत असूया आहे. कायम तिरस्कार करत असतात. या गोष्टीमुळे शिवसेनेची दशा झाली आहे. त्यांना झोपेत सुद्धा एकनाथ शिंदे दिसत असतात या गोष्टीचा काहीही संबंध नाहीये. ज्या काँग्रेसच्या गांधी घराण्यांनी मुंबईचा द्वेष केला आहे. त्यांच्या दाराजवळ जाऊन बसले आहेत. त्यांची चाकरी करत आहात. बाळासाहेबांचं हिंदुत्ववाद विसरायला लावले आहे . तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन बसले आहेत, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना चांगलंच फटकारलं आहे.