विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही, रामदास कदम यांचं थेट आव्हान; कुणावर केली जहरी टीका
VIDEO | २०२४ साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याला राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही, रामदास कदम भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल
रत्नागिरी : रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत संजय कदम यांचा राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. संजय कदम यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत परत घ्यावं लागलं, ही वेळ त्यांच्यावर आली का? असा प्रश्न विचारला असता शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाष्य केले आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संजय कदम यांना तीनदा मातोश्रीवरून बोलवण्यात आलं होते. मात्र हेतू फक्त संजय कदम नाही तर रामदास कदम यांच्या मुलाला संपवण्याचा हेतू होतां, असे रामदास कदम म्हणाले. तसेच रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. यावेळी बांडगुळ असा भास्कर जाधव यांचा उल्लेख करत रामदास कदम म्हणाले, भास्कर जाधव यांना मी कवडीचीही किंमत देत नाही, भास्कर जाधव नाच्या आहे. उपकाराची जाणीव नसणारा माणूस आहे. २०२४ साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भास्कर जाधव यांना राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही, त्याला परत विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही असे म्हणत भास्कर जाधवा यांना रामदास कदम यांनी आव्हान दिलं होतं.