'सुरूवात तुम्ही केली शेवट मी करणार', उद्धव ठाकरे यांना शिवसेना नेत्याकडून थेट चॅलेंज

‘सुरूवात तुम्ही केली शेवट मी करणार’, उद्धव ठाकरे यांना शिवसेना नेत्याकडून थेट चॅलेंज

| Updated on: Mar 06, 2023 | 2:51 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या तमाशाचे 19 मार्चला उत्तर देणार, शिवसेना नेता आक्रमक, नेमका काय केला हल्लाबोल?

रत्नागिरी : राज्यभरात सध्या चर्चा सुरू आहे ती काल खेडमध्ये झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची… या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी रामदास कदम म्हणाले, आज होळी आहे, शिमगा आहे. हा शिमगा मला राजकीय करायचा नव्हता, पण सुरूवात तुम्ही केली आता त्याचा शेवट मी करणार, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट इशाराच दिला आहे. अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला भविष्यात द्यावी लागणार आहेत, त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, मी शांत आहे तर मला शांत राहूद्या असेही रामदास कदम यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांना फटकारले.

Published on: Mar 06, 2023 02:51 PM