'बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही बेफाम झालात', रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात

‘बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही बेफाम झालात’, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात

| Updated on: Mar 06, 2023 | 3:34 PM

VIDEO | 'तुम्ही खेडमध्ये येऊन खूप मोठी चूक केली कारण...', रामदास कदम आक्रमक, काय म्हणाले बघा...

रत्नागिरी : राज्यभरात सध्या चर्चा सुरू आहे ती काल खेडमध्ये झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची… या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा वर्षाव केला. तुम्ही खेडला येऊन चूक केलीत. खेडमध्ये शिवसेना आम्ही उभी केली आहे. मिंध्यांची जीभ हासडून टाकीन असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण तुमच्यात हिंमत आहे का.. नारायण राणे गेले तेव्हा तुमची चड्डी पिवळी झाली होती. तुमच्या गाडीत पुढच्या सीटवर रामदास कदमला बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर पडत नव्हतात. किती केसेस आणि आंदोलनं आहेत, तुमच्यावर? शिवसेना मोठी होण्यासाठी अनेक शिवसैनिकांचे खून झालेत आणि त्याला मी साक्षीदार आहे. बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही बेफाम झाला, असे म्हणत रामदास कदम यांनी त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला.

Published on: Mar 06, 2023 03:34 PM