तर उध्दव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा, रामदास कदम भडकले

तर उध्दव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा, रामदास कदम भडकले

| Updated on: May 07, 2023 | 8:23 AM

VIDEO | 'कातळशिल्प चौपाटी नाही', बारसू दौऱ्यावर रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका

मुंबई : बारसू प्रकल्प मागे घ्या, अन्यथा सरकार कोसळेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला होता. मात्र याला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम म्हणाले, ‘जर मागेच घ्यायचा होता प्रकल्प तर त्यावेळी त्यावर तू शिकामोर्तब का केलं होतं आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तू हेतूपूर्वक रान पेटवत आहे. बारसू मध्ये जर आता लाठीचार्ज किंवा गोळीबार झाला आणि त्यात कोणी शहीद झाले तर उध्दव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा आग लावायचे काम हेच करत आहे. लोकांना भडकवण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहे. बारसूमध्ये होत असलेल्या रिफायनरी प्रोजेक्टला विरोध नाही तर केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध आहे. त्यामुळे शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी उद्धव ठाकरे सुडभावनेनं पेटले आहे, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Published on: May 07, 2023 08:23 AM