‘शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी ठाकरे सुडभावनेनं पेटलेत’, या नेत्याची सडकून टीका
VIDEO | बारसू दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना नेत्याचा हल्लाबोल, काय केली केली जहरी टीका
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी महाड येथे सभा घेतली. या सभेला मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तर कालच्या सभेमध्ये केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी ठाकरे सुडभावनेनं पेटले आहेत, अशी सडकून टीका करत उद्धव ठाकरे हे खूर्चीसाठी लायक नाहीत हे ३३ देशातील लोकांना कळलं असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘उध्दव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट तुम्हीच आणलात, बारसू हे देखील तुम्हीच सुचवले आणि आता कुठलं काळ तोंड करून कातळशिल्प बघायला जाताय तुम्ही थोडी शरम असती तर तिकडे गेले नसते’, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल उपस्थित केला आहे. तर हा माणूस किती विश्वास घातकी आहे. फक्त एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद कसे घालवता येईल एवढाच सुडाच्या भावनेने हा माणूस पेटला आहे, अशीही टीका रामदास कदमांनी ठाकरेंवर केली.