Ramdas Kadam | गद्दार कोण अनिल परब की मी हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे – रामदास कदम
रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला.माझा मुलगा योगेश याला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर आणलं होतं.
रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला.माझा मुलगा योगेश याला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर आणलं होतं. संजय कदमला तिकीट मिळावं म्हणून वारंवार प्रयत्न केले. पण माझ्या मुलाला तिकीट मिळालं. तो निवडून आला. परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी एकदाही माझ्या मुलाचा फोन उचलला नाही. उलट संजय कदमशी सातत्याने संपर्क ठेवला. या भागात मनसेचे वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठी घालण्याचं काम परब यांनी केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
Latest Videos