‘देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका, चावल्याशिवाय…’, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा थेट मुख्यमंत्र्यांना सल्ला
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवरून भाष्य करताना रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा सल्ला दिला आहे.
देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका, चावल्याशिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी केलंय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवरून भाष्य करताना रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा सल्ला दिला आहे. ‘ते पिल्लू… ज्याला पेंग्विन म्हणतात. तो देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जातोय. कारण एका मुलीने आत्महत्या केली होती जिचं नाव दिशा सालियान होतं. आता आदित्य ठाकरेला भिती वाटायला लागली, देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण काढलं तर याला बर्फाच्या लादीवर झोपवतील आणि फटकेच फटके पडतील’, असं रामदास कदम म्हणाले. पुढे रामदास कदम असेही म्हणाले, ‘तुमचा पेंग्विन आणि माझा पिल्लू दापोलीमध्ये येऊन म्हणाला होता, माझी सत्ता आली की या लोकांना मी बर्फाच्या लादीवर झोपवणार… पण आता कोणाला झोपवणार?’ असा सवाल रामदास कदमांनी केला. ‘मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेल देवाजी जरा जपून आम्ही ५५ वर्ष काढली… बडे नेते आहेत. मनोहर जोशी साहेबांना पण सोडलं नाही. त्यांना पण खाली उतरवला. देवा भाऊ तुळजाभवानीची शप्पथ आहे. हे साप आहेत साप, कितीपण जवळ घेतलं तरी विष दिलाशिवाय आणि चावल्याशिवाय राहणार नाही. यांना सोबत घेऊ नका’, असा सल्लाच रामदास कदम यांनी फडणवीस यांना दिला.