निवडणुका जवळ आल्या की ‘द केरला स्टोरी’ सारख्या गोष्टी पुढे येतात, भाजपवर नेमका कुणाचा रोख?
VIDEO | भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या 'त्या' टीकेवर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर
सातारा : भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसवर पैशाचे गोडाऊन असल्याची टीका केली होती. या टीकेला माजी मंत्री शिवसेना नेते सचिन अहिर यांनी प्रत्यूत्तर दिलंय. नितेश राणे यांनी स्वतः त्याठिकाणी तपास करण्यास यावे आणि त्यांच्याकडे खरी माहिती आहे तर ती तपास यंत्रणांना द्यावी, असे म्हटले आहे. तर निवडणुका जवळ आल्या की द केरला स्टोरी सारख्या गोष्टी पुढे आणल्या जातात. आपल्याला यूपी स्टोरी पण पाहायला मिळाली असती. गुजरात स्टोरी पण पाहायला मिळाली असती. पण हे सर्व कधी घडतं तर निवडणुका जवळ आल्यानंतरच, त्यामुळे असे विषय पुढे आणून त्याला राजकीय प्रोत्साहन दिल जाते आणि ज्या भागात दोन समाजामध्ये तेढ नाही. अशा भागातही तेढ निर्माण केली जाते. हे योग्य नसल्याचे मत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते सचिन अहिर यांनी कराड येथे व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केले आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्या जरी जाहीर केली तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार आहोत. आम्ही ही विनंती करतो की उद्याच निवडणुका जाहीर करा. कारण आम्ही ज्या वेळेला रस्त्यांमध्ये घोटाळा होतोय ,आरेमध्ये काही घोटाळा झाला ते हाऊसमध्ये सांगत होतो. त्या वेळेला कोणी ऐकलं नाही. आता भाजपचे अध्यक्ष आणि आमदार बोलू लागले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्या जाहीर करा, आम्ही त्यासाठी तयार आहोत आणि मुंबईकर ठरवतील कोणाच्या हातात सत्ता द्यायची आहे, असा विश्वासदेखील सचिन अहिरयांनी व्यक्त केला आहे