MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 18 September 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास संजय राऊत यांनी नकार दिला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. पण ही आतली चर्चा आतमध्ये. बाहेर का सांगू?, असा सवाल करत संजय राऊत यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला.
संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गणेशोत्सव सुरू आहे. उद्या विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं. थोड्यावेळ गप्पा मारल्या. गणपती सुद्धा राजकारण्यांचा गुरू आहे. राजकारण्यांनी गणपतीकडून अनेक गोष्टी शिकव्यात. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो… या चर्चा आतमध्ये. त्या बाहेर कशाला सांगायच्या?, असं राऊत म्हणाले.