Devendra Fadnavis मुख्यमंत्री असताना Aurangabadचं Sambhaji Nagar का केलं नाही? – Sanjay Raut

| Updated on: Jan 24, 2022 | 7:37 PM

योगींनी प्रयागराज करून घेतलं तसंच फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही? हा सुद्धा प्रश्न आहे. आम्हला बाळासाहेबांनी तेव्हाच सांगितलं संभाजीनगर तेव्हाच ते आमच्यासाठी झालं आहे, असेही राऊत म्हणालेत.

मुंबई : औरंगाबादचे नाव बदलण्यावरूनही संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल चढवलाय. आपणही पाच वर्ष मुख्यमंत्री होता. त्यावेळी औरंगजेबाला कवटाळून बसला होता का ? असा सवाल फडणवीसांना राऊतांनी केला आहे. एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल तर केंद्राची परवानगी लागते. गेल्या काही वर्षापासून सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. केंद्राने का परवानगी दिली नाही? हे विचारावे लागेल. तुम्हीही पाच वर्ष मुख्यमंत्री होता, तुम्हाला असं का वाटलं नाही? योगींनी प्रयागराज करून घेतलं तसंच फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही? हा सुद्धा प्रश्न आहे. आम्हला बाळासाहेबांनी तेव्हाच सांगितलं संभाजीनगर तेव्हाच ते आमच्यासाठी झालं आहे, असेही राऊत म्हणालेत.