Special Report | तेच Shiv Sena Bhavan… Sanjay Raut यांचं नवं टार्गेट कोण?

| Updated on: Mar 07, 2022 | 9:43 PM

संजय राऊत यांनी यापूर्वी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे किरीट सोमय्या हे होतं. त्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोम्मया आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एकदा शिवसेना (Shivsena) भवन इथं पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट द्वारे उद्या सांयकाळी शिवसेना भवन येथे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलंय. संजय राऊत यांनी यापूर्वी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे किरीट सोमय्या हे होतं. त्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोम्मया आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता. गेल्या काही दिवसांमधील महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत नेमक काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.