काही बड्या नेत्यांचा जालन्यात दंगल घडवण्याचा प्लॅन होता; शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जालन्यात दंगली घडवण्याचे काम जाणीवपूर्वक केलं गेलं असून जालन्यात दंगल घडवण्याचा प्लॅन काही बडे नेते आखत होते, असा मोठा दावा शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तर मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं प्रयत्न करणाऱ्यांवर आता शासन कठोर कारवाई करणार, संजय शिरसाट यांनी दिला इशारा
छत्रपती संभाजीनगर, २७ नोव्हेंबर २०२३ : जालन्यात दंगली घडवण्याचे काम जाणीवपूर्वक केलं गेलं असून जालन्यात दंगल घडवण्याचा प्लॅन काही बडे नेते आखत होते, असा मोठा दावा शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ते म्हणाले, राज्यात जातीय दंगली घडणार असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे जालन्यातील घटनेला पुष्टी मिळाली आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांततेत पार पडत होतं. मात्र यादरम्यान, जालन्यात दंगल घडवण्याचा प्लॅन काही बडे नेते आखत होते, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह संजय राऊत यांचाही सहभाग होता, असा गंभीर आरोपही संजय शिरसाट यांनी केला. शांततेत सुरू असणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं प्रयत्न करत होते, त्यांच्यावर आता शासन कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला आहे.